Initiatives
स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम योजना
आजचे विद्यार्थी उद्याचे नागरीक हा दृष्टीक्षेप लक्षात घेउन मा पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, पोलीस नाईक सारफळे यांनी दि 04/04/2025 रोजी जिल्हा परिषद शाळा वालवड ता भूम जि धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थीना मार्गदर्शन करण्यात आले..Read More
धाराशिव जिल्हातील पोलीस दलात वार्षीक तपासणी दरम्यान विविध शाखेचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उदघाटन
आज दि 27/03/2025 रोजी धाराशिव शहर पोलीस ठाणेच्या कामकाजाची पाहणी करुन पोलीस स्टेशन परिसरातील ऑक्सीजन पार्कचे उदघाटन करुन वृक्षारोपन केले. धाराशिव शहर पोलीस ठाणे येथील बांधकामाचे नुतनीकरण करुन वाचनालयाची उभारणी करण्यात आली असुन मा.श्री. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, परिक्ष्ेत्र छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले...Read More
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर लॅबचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उदघाटन
आज दि. 27/03/2025 रोजी सायबर गुन्ह्याचा तपास आधुनिक पध्दतीने करण्या करीता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे आधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज सायबर लॅबची उभारणी करण्यात आली आहे. सदर सायबर लॅबचे मा. श्री. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक, श्री. संजय जाधव. मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. पोलीस उप अधिकक्षक मुख्यालय श्री. मनिष पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि भिंगारे, कासुळे व इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते...Read More
पोलीस ठाणे भुम अंतर्गत वालवड येथे मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब यांचे हस्ते CCTV चे उदघाटन करण्यात आले सदरवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ व पोलीस ठाणे प्रभारीपोलीस निरीक्षक श्री प्रल्हाद सुर्यवंशी व इतर नागरीक उपस्थित होते
पोलीस ठाणे भुम अंतर्गत वालवड येथे मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब यांचे हस्ते CCTV चे उदघाटन करण्यात आले सदरवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ व पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री प्रल्हाद सुर्यवंशी व गावातील नागरीक उपस्थित होते..Read More
मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयातील नवीन जीम येथे पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच नागरीकांकरीता नवीन कायदेविषयक कार्यशाळा संपन्न
मा.पोलीस अधिक्षक धाराशिव श्री संजय जाधव यांचे मार्गदशर्नाखाली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकासाठी पोलीस मुख्यालयातील नविन जीम येथे जिल्हा स्थरावरील नविन तीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन आज दि. 17/03/2025 रोजी 1100 करण्यात आले. सदर कार्यशाळेमध्ये ॲड श्री. एम. एन चव्हाण, विधी अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव, व ॲड अमोल गुंड चिफ डीएलएसए यांनी नविन तीन कायद्याखाली मार्गदर्शन केले. कार्यशाळेत पोलीस अधिकारी अंमलदार यांनी विचारलेल्या शंकेचे श्री चव्हाण व श्री गुंड यांनी निरसन करुन आवश्यक ते मार्गदर्शन केले सदर कार्याक्रमावेळी पोलीस उप अधिक्षक मुख्यालय पोलीस निरीक्षक श्री. पाटील, धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, अमंलदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...Read More
पोलीस अधीक्षक कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली
आज 19 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे मा. पोलीस अधीक्षक, श्री संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते...Read More
सायबर सुरक्षेच्या दृष्टीने शालेय विदयार्थी/ विदयार्थीनींना जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन
सायबर सुरक्षेच्या दृष्टीने शालेय विदयार्थी/ विदयार्थीनींना जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन शालेय विदयार्थी विदयार्थीीना सायबर सुरक्षा तसेच सायबर गुन्हयाविषयी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात सोशल मिडीयाचे वापराबाबत व सायबर गुन्हे तसेच आर्थीक फसवणुक होवु नये म्हणुन काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्हेगार सामान्य लोकांना बॅंकेतुन मॅनेजर बोलत असल्याचे सांगुन त्यांचे अकाउंट बंद होण्याची भिती दाखवुन ओटीपी, एटीएम कार्ड डिटेल्स घेवुन नागरीकांची आर्थीक फसवणुक करतात तरी कोणीही आपले बॅक अकांउट सबंधाने डिटेल्स ओटीपी, एटीएम कार्ड डिटेल्स याची माहिती देवु नये अन्यथा आपली आर्थीक फसवणुक होवु शकते...Read More
मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 100 दिवसाची कृती आराखडा च्याअनुषंगाने जिल्हयातील पोलीस अधिकारी अंमलदार यांचेकरिता नविीन कायद्याचे प्रशिक्षण सत्र आयोजीत केले
भारतीय संसदेने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन कायदे पारित केले असुन त्यांची अंमलबजावणी दि.01/07/2024 पासुन सुरू झालेली आहे. नविन कायदयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आणि जनसामान्य व अंमलबजावणी यंत्रणेला कायद्याची ओळख करून देण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक यांचे स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणे बाबत मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी त्यांच्या 100 दिवसाची कृती आराखडा च्याअनुषंगाने सुचना दिलेल्या आहेत सदर प्रशिक्षणास मा.मुख्य शासकीय अभियोक्ता श्री महेंद्र देशमुख यांनी मार्गदर्शन केले..Read More
धाराशिव जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेचे डिएसबीचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार यांच्यासाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले
धाराशिव जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यातील जिल्हा विशेष शाखेचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार यांचे करिता पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिटींग हाॅल येथे एक दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रशिक्षणास मा.अपर पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन केले तसेच चरित्र पडताळणी व इतर कामकाज वेळेत पुर्ण करून सर्व प्रकरणाची लवकरात लवकर निर्गती करावी जेणेकरून नागरीकांना वेळेत माहिती मिळेल..Read More
धाराशिव जिल्हयातील पोलीस अधिकारी/ अंमलदार यांच्यासाठी सायबर प्रशिक्षण सत्राचे आयोजन
धाराशिव जिल्हयातील पोलीस अधिकारी अंमलदार यांना सायबर गुन्हयाचा तपास करता यावा तसेच आरोपी शोधण्यासाठी टेक्नाॅलाॅजीचा वापर करता यावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये पोलीस अधीक्षक कार्यालय मिटींग हाॅल येथे दोन दिवसीय सायबर संबंधाने प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेचे एक अधिकारी व दोन अंमलदार हजर होते...Read More
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्त वाहतुक शाखेच्या वतीने मोटारसायकल रॅली काढुन जनजागृती करण्यात आली
रस्ता सुरक्षा सप्ताहनिमीत्त वाहतुक शाखा वतीने हेल्मेट रॅली काढण्यात आली सदर रॅलीला मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरवात करण्यात आली. नागरीकांनी मोटारसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा तसेच वाहतुक नियमांचे पालन करावे असे धाराशिव पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे...Read More
वाहतुक सुरक्षा सप्ताह निमीत्त लोहारा पोलीसांचे नागरीकांकरिता जनजागृती अभियान
लोहारा शहरात दि 23/01/2025ते 29/01/2025 दरमयान वाहतुक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,जगदंबा मंदीर चौक लोहारा येथे वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त पि ए सिस्टम द्वारे अनाउन्समेंट करून जनजागृती करण्यात आली..Read More
MONTHLY RIWARD SYSTEM
पोलिस अधिकारी व अंमलदार यांना कामामध्ये प्रोत्साहन देण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच संपकल्पनेतून प्रत्येक महिन्यात गुन्हे बैठकीत चांगले पोलीस ठाणे, चांगले कामगिरी करणारे अधिकारी/अंमलदार, बेस्ट डिटेक्शन, बेस्ट कनव्हिक्शन इ. मुददयांवरून त्यांना ट्राॅॅॅफी तसेच बक्षिस देवून गौरविण्यात येते...Read More













