Good Work
मा. पोलीस अधिक्षक श्री. अतूल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक प्रदान
मा. पोलीस अधिक्षक श्री. अतूल कुलकर्णी यांनी नक्षलग्रस्त जिल्ह्यात उत्कृष्टरित्या सेवा बजावल्याने त्यांना मा. श्री. तानाजीराव सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, उस्मानाबाद यांचे हस्ते विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले..Read More
“उस्मानाबाद पोलीस दलातील सात जणांना ‘पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह’ जाहिर.”
“उस्मानाबाद पोलीस दलातील सात जणांना ‘पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह’ जाहिर.” महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यादरम्यान उत्तम, उल्लेखनिय, प्रशंसनीय कामगीरी करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यातर्फे प्रती वर्षी ‘पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह’ जाहिर केले जाते. सन- 2022 या वर्षात उस्मानाबाद जिल्हयातील खालील 7 पोलीस अधिकारी /अंमलदार यांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. 1) श्री आर. एम. ठाकुर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक,नेमणुक वाहतुक शाखा 2. श्री. के. बी. रोकडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक नेमणुक पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण 3. श्री जी. आय. पठाण, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, नेमणुक- पोलीस ठाणे लोहारा 4. श्री एच. एम. पठाण, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, से. नि. 5. आर. डी. कवडे, पोलीस हवालदार से. नि., 6. श्री आर डी कचरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, नेमणुक- मोटार परिवहन विभाग उस्मानाबाद, 7. श्री एम. डी. कळसाईन, पोलीस हवालदार नेमणुक - वाचक शाखा अपोअ कार्यालय उस्मानाबाद यांना जाहिर झाले आहे. सन्मानचिन्ह प्राप्त या सात जणांचे मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी यांनी अभिनंदन केले असून पोलीस दलातील इतर सहकाऱ्यांनी त्यांचा आदर्श घेउन उत्कृष्ट कार्य करावे असे आवाहन केले आहे...Read More