उस्मानाबाद पोलीसांसह कुटूंबीयांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन

पोलीसांच्या वेळी- अवेळीच्या, धकाधकीच्या कर्तव्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यांच्यावरील जबाबदाऱ्या, ताण ह्या बाबी विचारात घेउन मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार यांसह त्यांच्या कुटूंबीयांसाठी उस्मानाबाद पोलीस दल व मुंबई येथील ‘तेजस्विनी हेल्थ केअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 02.01.2023 ते दि. 12.01.2023 या कालावधीत पोलीस मुख्यालयासह जिल्हाभरातील पोलीस ठाण्यात आरोग्य शिबीराचे आयोजीत केले आहे. या आरोग्य शिबीराचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आज दि. 02.01.2023 रोजी पोलीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृहात’ करण्यात आले. यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांसह पोलीस मुख्यालयातील अधिकारी- अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटूंबीयांनी मोठ्या प्रमाणात शिबीराचा लाभ घेतला. शिबीरादरम्यान संपुर्ण शारिरीक तपासणी ॲक्युप्रेशर व फिजिओथेरपी उपचार, संगणकीय ऑटोमॅटीक जर्मन स्कॅनिंग पध्दतीद्वारे उपचार तसेच फुफ्फुस, हृदय गती, रक्तशर्करा, यकृत, मुत्रपिंड, त्वचा रोग, हाडांचे विकार, स्त्रियांचे आजार इत्यादी महत्त्वाच्या तपासण्या केल्या जाणार असून त्याचा लाभ पोलीस व त्यांच्या कुटूंबीयांस होणार आहे.