सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा निरोप समारंभ मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांनी सेवानिवृतांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. धाराशिव पोलीस दलातील पोलीस उप निरीक्षक. रब्बानी अब्दुल आरेफ जुनेदी, श्रेणी पोलीस उप निरीक्षक श्री. शंकर जगदाळे, महेबुब खान पठाण, सहाय्यक पोलीस फौजदार संदीपान साबळे, राजासाहेब फुलारी, पोलीस हावलदार तुकाराम खामकर, सोनटक्के, पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रमुख लिपीक राजाराम पवार या 8 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ आज दि. 31/03/2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सभागृहात मा. पोलीस अधीक्षक श्री, संजय जाधव, यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला.
निरोप समारंभादरम्यान मा. पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सपोनि श्री. संतोष तिगोटे यांनी केले. तर कार्यक्रंमाचे आभार प्रदर्शन पोनि श्री. श्रीगणेश कानगुडे यांनी केले. सदर वेळी पोनि विनोद इज्जपवार, पोनि चिंतले उपस्थित होते.