Initiatives by Police Welfare
माहिती अधिकार कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे आणि जिल्हा पोलीस दल उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व अधिकारी, अंमलदारासाठी माहिती अधिकार कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन आज रोजी करण्यात आले होते. मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत शिवाजीराव पवार,नितीन राऊत यांनी कायद्याची माहिती,कायद्यातील कलमे,जिल्हा न्यायालय,उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालयांतील खटल्याचे संदर्भ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेत पोलीस अधिकारी,अंमलदारांनी विचारलेल्या शंकेचे श्री. पवार व श्री. राऊत यांनी निरासन करुन आवश्यक ते मार्गदर्शन केले. कायदेविषयक माहिती अवगत असल्यास पोलीस आणि नागरिकांना कायदेविषक ज्ञान मिळुन प्रशासनात गतिमानता येते या उद्देशाने या कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्हयातील सर्व पोलीस उपअधिक्षक, पेालीस निरीक्षक अंमलदार मोठया संख्येने उपस्थित होते.
“पोलीसांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन.”
उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस अधिकारी- अंमलदार यांच्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा कर्तव्य बजावत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे ते काम करत असताना त्यांना प्रेरणा मिळावी, उत्साह वाढावा व त्यांनी आनंदाने कर्तव्य बजावावे या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांनी दि. 23.12.2022 व दि. 24.12.2022 या दोन दिवशी उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृह’ येथे उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार यांसाठी प्रेरणादायी व्याख्याते श्री. अरशर सय्यद यांचे व्याख्यान आयोजीत केले होते. सदर व्याखानावेळी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. नवनीत काँवत यांसह पोलीस मुख्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी- अंमलदार तसेच जिल्ह्यातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांसह पोलीस अधिकारी- अंमलदार हे मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
“पोलीस अधिकारी- अंमलदार यांच्या पाल्यांसाठी ऑनलाईन शिक्षण.”
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून स्मानाबाद पोलीस दलातील पोलीस अधिकारी- अंमलदार यांच्या पाल्यांच्या शिक्षणात सुलभता आणण्यासाठी इयत्ता 4 थी ते 12 वी पर्यंत सर्व बोर्ड आणि भाषामध्ये BYJU* S या ऑनलाईन शिक्षणाच्या व्यासपीठावर ग्लोबल थॉट फौंडेशन, मुंबई यांच्याद्वारे पोलीस पाल्यांसाठी मोफत 3 वर्षाचे सदस्यता देण्यात आले. याचा लाभ उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार यांनी मोठ्या प्रमाणात घेतला असून 4 थी ते 12 वी पर्यंतच्या 351 पोलीस पाल्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. सदर सदस्यतेचे ऑनलाईन उद्घाटन दि. 15 ऑगस्ट रोजी असून यामुळे पोलीसांच्या धावपळीच्या व अनियमित कर्तव्यामुळे त्यांच्या पाल्यांना या ऑनलाईन शिक्षाणाचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.
उस्मानाबाद पोलीसांसह कुटूंबीयांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन
पोलीसांच्या वेळी- अवेळीच्या, धकाधकीच्या कर्तव्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यांच्यावरील जबाबदाऱ्या, ताण ह्या बाबी विचारात घेउन मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार यांसह त्यांच्या कुटूंबीयांसाठी उस्मानाबाद पोलीस दल व मुंबई येथील ‘तेजस्विनी हेल्थ केअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 02.01.2023 ते दि. 12.01.2023 या कालावधीत पोलीस मुख्यालयासह जिल्हाभरातील पोलीस ठाण्यात आरोग्य शिबीराचे आयोजीत केले आहे. या आरोग्य शिबीराचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आज दि. 02.01.2023 रोजी पोलीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृहात’ करण्यात आले. यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांसह पोलीस मुख्यालयातील अधिकारी- अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटूंबीयांनी मोठ्या प्रमाणात शिबीराचा लाभ घेतला. शिबीरादरम्यान संपुर्ण शारिरीक तपासणी ॲक्युप्रेशर व फिजिओथेरपी उपचार, संगणकीय ऑटोमॅटीक जर्मन स्कॅनिंग पध्दतीद्वारे उपचार तसेच फुफ्फुस, हृदय गती, रक्तशर्करा, यकृत, मुत्रपिंड, त्वचा रोग, हाडांचे विकार, स्त्रियांचे आजार इत्यादी महत्त्वाच्या तपासण्या केल्या जाणार असून त्याचा लाभ पोलीस व त्यांच्या कुटूंबीयांस होणार आहे.