धाराशिव जिल्हयातुन एकुण 1276 मोबाईलपैकी 284 मोबाईलचा सायबर पोलीसांकडुन शोध घेवुन 30 मोबाईल मुळ मालकास परत दिले
भारत सरकारने दुरसंचार व दळणवळण विभागाने हरविलेल्या अथवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सीईआयआर पोर्टल सुरू केले असून सदर पोर्टलचा वापर करून सायबर पोलीसांनी धाराशिव जिल्हयातुन गहाळ झालेले मोबाईल् तसेच चोरी गेलेल्या एकुण 1276 मोबाईलपैकी 284 मोबाईलचा शोध घेतला असुन त्यापैकी गहाळ मोबाईल मधील 30 मोबाईल मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांचे हस्ते नागरीकांना परत करण्यात आले आहेत. नागरीकांनी यापुढे मोबाईल् हरवल्यास सीईआयआर पोर्टल वर तक्रार करावी