Good Work | Dharashiv Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

पवन चक्कीचे तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात





    दि १९.०३.२०२५ रोजी पोलीस ठाणे नळदुर्ग हददीतील मौजे गंधोरा पाटी येथे काही अज्ञात चोरटयांनी रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना मारहाण करून तेथील पवनचक्कीचे आतील वायरमधील तांब्याच्या तारा बळजबरीने चोरून नेली होती. सदरबाबत पोस्टे नळदुर्ग येथे अज्ञात आरोपीविरोधात गुरनं क्र गुरनं ८८ / २५ कलम ३०९ (६), ३२४ (५), ३ (५) भान्यासं अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    सदरील गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने वरीष्ठ अधिका.यांनी सखोल चौकशी करून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदरील गुन्हयाचे घटनास्थळ तसेच आजूबाजूचे परीसराची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेतील सहा पोलीस निरीक्षक कासार व त्यांचे पथकाने तंत्रज्ञानाचे सहाय्याने तसेच पारंपारीक स्त्रोताकडून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने काही महत्वपुर्ण पुरावे शोधून काढले. उपलब्ध माहितीला अनुसरून १ . सुनिल कालीदास शिंदे वय ३६ वर्ष रा.दत्तनगर पारधी पिढी ढोकी ता. जि. धाराशिव, २. सरदार उर्फ गणेश शंकर काळे रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव ह. मु. येळंब घाट ता. जि. बिड. ३. राहुल लाला शिंदे वय २९ वर्ष रा. दत्तनगर पारधी पिढी ढोकी ता. जि. धाराशिव यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.

    सखोल चौकशीदरम्यान तीनही आरोपींना नमुद गुन्हा त्यांनी स्वत: आणि इतर ०८ आरोपीनी मिळून केल्याची कबुली दिली. तसेच धाराशिव जिल्हयात यापुर्वी दाखल अशाच स्वरूपाच्या इतर ०६ गुन्हयाची देखील आरोपींनी कबुली देवून त्यांतील एकूण ७२१ फुट लांबीची तांब्याची तार व गुन्हयात वापरलेले वाहन टाटा सुमो असा एकूण १२,२३,४५० रु चा मुददेमाल काढून दिलेला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी व मुददेमाल पुढील कारवाईकामी पोलीस ठाणे नळदुर्ग यांचे ताब्यात देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी मागील काही दिवसांपासून पवनचक्कीवर लुटमार करणरी टोळी ताब्यात घेतल्यामुळे पवनचक्की कंपन्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे.

    सदरची कामगीरी माण् पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांचे नेतृत्वात सपोनि श्री. सुदर्शन कासार यांनी स्वतः व त्यांचे पथकातील सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताड, जावेद काझी, फहरान पठाण, दयानंद गादेकर, पोअं योगेश कोळी, चालक नितीन भोसले यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली आहे.