स्थानिक गुन्हे शाखेने कळंब पोलीस ठाणे हददीतील महिलेच्या खुनाचे गुढ उलगढले
मा पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव साहेब व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आदेशावरून दिनांक 01/ 04/ 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि इज्जपवार, सपोनि कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणणेकामी रवाना होवून उपविभाग कळंब येथे आले असता पथकास गोपनीय बातमीदार यांचे मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कळंब हद्दीत काही दिवसापुर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हा येरमाळा कळंब रस्त्यावर थांबला आहे.
व तो कोठेतरी निघून जायचे तयारीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून एका निर्जन ठिकाणी 01 संशयित इसम थांबलेला दिसून आला. पथकाने त्याला ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नावे. राण्या उर्फ रामेश्वर माधव भोसले, वय 32 वर्षे, व्य.वाहनचालक राण्.केज, ता. केज जि. बीड असे सांगितले. त्यास विश्वासात घेवून त्याचे कडे चौकशी केली असता त्यानी सांगीतले की व्दारकानगरी कळंब येथे राहण्यास असलेल्या एका महिलेचा खुन केला असल्याचे सांगीतले.
तसेच त्याचा साथीदार उस्मान सय्यद याने त्याला पळून जाण्यास मदत केली. व नुमद महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत सुचविले असे सांगितलेण्. त्यावरुन पथकाने त्यास ताब्यात घेतले. प्राप्त माहितीवरुन आरोपी रामेश्वर माधव भोसले व उस्मान गुलाब सय्यद दोघे रा. केज ता. केज जि. बीड यांनी गुरनं 119/2025 कलम 103 (1),249, 239 भा.न्या.सं. हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील कार्यवाही कामी कळंब पोलीस ठाणे येथे हजर केले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासारए सपोफौ वलीउल्ला काझी,पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण यांच्या पथकाने केली आहे.