200 किलो अल्युमिनियम धातुच्या तारा चोरणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
मा पोलीस अधीक्षक, श्री संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक, शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोह विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, पोअं दहीहंडे, पोअं प्रकाश बोईनवाड असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे आनंदनगर गुरनं 111/2025 कलम 303 (2) हा गुन्हा आरोपी नामे हणुमंत रामा बोडके रा शासकीय दुध डेअरी बाजूला साठे चौक धाराशिव ता जि धाराशिव निखील राजेंद्र मंजुळे रा शिवाजी महाराज चौक वडार गल्ली धाराशिवए आरविंद बाबा क्षिरसागर राण् साठे नगर धाराशिव यांनी मिळून केला असुन ते बेंबळी रोडला थांबले आहेत अशी माहिती मिळाल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) हणुमंत रामा बोडके वय 24 वर्षे रा शासकीय दुध डेअरी बाजूला साठे चौक धाराशिव 2) निखील राजेंद्र मंजुळे, वय 21 वर्षे रा शिवाजी महाराज चौक वडारगल्ली धाराशिवए 3) अरविंद बाबा क्षिरसागर वय 21 वर्षे रा साठेनगर धाराशिव असे सागिंतल्यांने त्यांचे कडे चोरीच्या गुन्ह्या बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्यांनी सांगितले शिंदे कॉलेज जवळ वरुडा रोडच्या जवळ असलेल्या एका गेडावून येथुन चोरी केल्याची कुबूली दिली