पानबुडी मोटर चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात-
रामवाडी ता. जि. धाराशिव शिवारातील पानबुडी मोटर चोरी झाल्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे ढोकी येथे गुन्हे दाखल करण्यात आले असुन मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदर गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केल्याने दिनांक 03/03/2025 रोजी सपोनि कासार व पथक यांना नमूद गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणातुन काही इसमांची नावे प्राप्त झाल्याने सदरबाबत पोस्टे मुरुड जिल्हा लातूर हद्दीत जाऊन संशयत इसम ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच चोरी केलेला मुद्देमाल 02 पानबुडी मोटर किंमत 35,000 रुपये तसेच चोरी करताना वापरलेले एक चार चाकी वाहन किण् 8,00,000 रुपये व एक दुचाकी कि 90,000 रुपये असा एकूण 9ए25ए000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाण. सदरचा मुद्देमाल पोस्ट ते ढोकी गुरनं 75/2025 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता या गुन्ह्यातील असल्याचे अभिलेखावरून स्पष्ट झाले नमूद गुन्ह्यात आरोपी नामे आकाश पप्पू कसबे रा. दत्तनगर, मुरुड ता. मुरुड जि. लातुर यास ताब्यात घेऊन नमुद आरोपी व मुद्देमालासह पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे ढोकी यांचे ताब्यात देण्यात आले आहे