तुळजापुरात विक्रीकरीता येणारे ड्रग्स पकडले स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलीसांची कारवाई
मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे तामलवाडी यांना अमली पदार्थ विक्री करणारे इसमां वर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे तुळजापूर उपविभागात गस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही इसम अमली पदार्थ विक्रीकरिता तुळजापूर येथे आणणार अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ तामलवाडी पोलिसांची मदत घेऊन सोलापूर तुळजापूर महामार्गावर गस्त केली असता तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने एक मोटर कार संशयितरित्या थांबलेली दिसून आली तसेच कार मध्ये तीन इसम बसलेले दिसून आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे कडे एमडी हा अम्ली पदार्थ असल्याचे सांगितले. त्यांनी एमटी हा अमली पदार्थ मुंबईतून तुळजापुरात विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून 59 पुड्या एमडी अमली पदार्थ किमत 2,50,000₹ तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण 10,75,000₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेले इसमांची नावे अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी दोघे राहणार तुळजापूर व संदीप संजय राठोड राहणार नळदुर्ग अशी असून सदर इसमांना पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे तामलवाडी येथे जप्त मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. सपोनी कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील नमूद इस्मविरुद्ध एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.