खामसवाडी शिवारात अवैध अफुच्या झाडाची लागवड करून संवर्धन करणा-या इसमावर शिराढोण पोलीसांची कारवाई
दिनांक 14/02/2025 रोजी शिराढोण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक, कल्याण नेहरकर यांना गोपनिय माहीती मिळाली की, खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव येथे एका इसमाने त्याचे शेतात स्वताःच्या आर्थीक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशिर रित्या गांज्याच्या झाडांची लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहे, अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय पवार साहेब उप विभाग कळंब यांना रेड बाबत माहीती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणे कामी कळंब तहसील कार्यालयाचे सक्षम अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांना माहीती देवुन शासकीय पंचासह माहीतीच्या ठिकाणी छापा मारला असता, खामसवाडी शिवारात शेत गट नं 119 व 121 मध्ये शेतकरी इसम नामे संभाजी उर्फ बंडु भिमराव हिलकुटे, वय 54 वर्षे, रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव याने स्वतःचे व वडीलाचे नावे असलेल्या शेतामध्ये अवैध आफुची झाडे लावुन त्याचे संवर्धन करीत असताना मिळुन आला. त्याचे शेतातुन एकुण 347 किलो 280 ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे एकुण किंमत 27,78,240 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, सदर शेतकरी यांचे विरुध्द शिराढोण पोलीस स्टेशन येथे गुरनं 31/2025 कलम 15, 18 एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.