आॅपरेशन मुस्कान अंतर्गत भुम पोलीसांची कामगीरी हरवलेला चिमुकला एका तासाच्या आत आईजवळ पोहचला
दि.25/01/2025 रोजी भुम शहरातील यश मंगल कार्यालयाजवळ एक लहान मुलगा रडत उभारला होता त्यावेळी तेथील दुकानदार व इतर व्यक्तींनी त्यास भुम पोलीस ठाणे येथे आणले कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अंमलदार शबाना मुल्ला हजर होत्या त्यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांना दिली यावेळी पोलीसांनी सदरील चिमुकल्यास संवाध साधन्याचा प्रयत्न केल्यावर आई माॅलमध्ये कामाला गेली असे सांगत होते त्यानुसार महिला पोलीस अंमलदार मुल्ला यांनी शहरातील विठठल मार्ट व श्रध्दा सुपर शाॅपी येथे नेवुन त्याच्या आईबाबत चैकशी केली असता श्रध्दा सुपर शाॅपी मध्ये काम करणा-या भाग्यश्री प्रदीप क्षिरसागर यांचा तो मुलगा असल्याचे समजले. आई कामाला जात असताना तो आईच्या पाठीमागे आला परंतु, त्याला घराकडे जाण्याचा रस्ता लक्षात आला नाही व तो भरकटल्याने सदरील ठिकाणी रडत उभा राहीला पोलीसांच्या तत्परतेने या प्रकरणात मुलाच्या आईच्या शोध घेत त्यास आईकडे सोपविण्यात आले